….
कशाला उगाचच
माणसं अशी भेटतात
दुरावताना का मग
डोळ्यात मेघ दाटतात ...
दाटलेल्या मेघांना
सावरणारं कोणी नसतं
ओघळणाऱ्या आसवांना
पुसणारं कोणी निघून जातं ….
कश्यासाठी हि आशेची
तार मनामध्ये छेडतात
दुरावताना मात्र मग
डोळ्यात मेघ दाटतात ….
सुख-दुःखाच्या क्षणांना
क्षणात आपलंसं करतात
आणि दूर जाताना
क्षणांनाही दूर नेतात ….
या दोन क्षणांच्या आठवणी
मैफिलीत सोडून जातात
दुरावताना मात्र मग
डोळ्यात मेघ दाटतात ....