Friday, July 24, 2015

Sahal !!

Yesterday I read a nice quote  :

People come into your life for a reason, a season or a life time either as a  blessing or a lesson. 


Hach vichar manat asatana coincidently ek sundar marathi lekh vachanat aala ....Pu la deshpande yanna ekada konitari vicharala tumhi evadhe anandi kase aasata nehami ? Tyanni hajarjababi pane uttar dila:
" Me asa samajato , Ayushya ek sahal aahe  ... Sahalila jatana nahi ka apan sagalya gosti lightly get !! jasa bhandana zali kinva kahi problems aale trip madhe te tevadhya purate aasatat , parat yeto tenva aapan sagala visarun jato. Tasa samajayacha , ya pruthvi-talavar aapan ek sahal mhanun yeto, ani tya sahalicha apan anand ghyayacha !! "

Eka prasidha vinodi lekhakane mandalela ha adhyatmik vichar sahaj avadun gela. Dhanya te PuLa tumhala koti koti pranam!! 

Cheers !!
Sonia

Sathiya Tune Kya Kiya

Someone suggested me to play "Sathiya Tune kya Kiya" on flute. I thought this song is not suitable for flute. But when  suggested again , I thought of downloading it from YouTube and giving a try on flute. Song Flute var try karta karta , I went back to olden golden days of teen age. Most of us used to like this song. Tya veles chya count down madhe barech diwas number one song hota. Its romantic melodious song sung by SP and Chitra. S P Balasubramanyam cha soothing & loving voice and Chitra cha honey-coated and mischievous voice spreads Love In The Air. Salman khan and Revati takes you to the lovey-dovey world. Asa fairy tale romance  avadayacha tenva....

Aaj parat he gana aaikalyavar vatala, kuthe gela fairy tale romance?  Ayushyat kahi kamavatana ek sweetness gamavato apan sagale. Abhyas , nokari  , paisa ani rank maintain karnyachya gadbadit ek chotasa swapna harvun jata baryach janancha tasa kahi tari  ugachach vatun gela... sagalikade materialistic apeksha vadhlelya asatana , calulated prem karun lagna kasa kartat loka ha prashna manala tochun gela.  Kahi tari gamavalyacha dukha kavtalun basanyapeksha ek navin swapna deun gela he gana. Asa innocent ani genuine hava relation asa suchaun gela he gana...

Itanee mohababt sah na sakunga, Sach mano jinda rah na sakunga
Tujhko sambhaloo yeh mera jimma, Mai hu toh kya hai jane tamana
Abb jina marana mera, Janam tere hath hai
Maine kaha na sanam, Abb tu mere sath hai
Toh phir sambhal, ke me chala
Jana kaha, aa dil me aa ... la la la la ... la la la la la ...

Sathiya tune kya kiya, Beliya ye tune kya kiya
Maine kiya tera intezar, Itna karo naa muje pyar
Itna karo naa muje pyar, Sathiya tune kya kaha
Beliya ye tune kya kaha, Yu na kabhee karna intezar
Maine kiya hai tumase pyar, Maine kiya hai tumase pyar

Ani ek chotishi charoli suchvun gela he gana ...

Dolyat sathavun tula  manomani pahat rahava,
kshanokshani tuzyach athavanit zurat rahava,

hat hatat gheun tuza asach zulat rahava,
man ani naata haluvar ayushyabhar fulat rahava .. 

Monday, March 30, 2015

माझे पहिले प्रेमपत्र !! .... हसऱ्या चष्म्यातून ...4

माझे पहिले प्रेमपत्र !! … हसऱ्या चष्म्यातून
सगळ्या पहिल्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. पहिली शाळा , पहिलं कॉलेज , पाहिलं प्रेम , पहिली नोकरी , पहिला पगार , पहिली गाडी ,घर वगैरे वगैरे
                            काही वर्षांपूर्वीची गोष्ट.  As usual , माझी बस चुकली आणि मी २-३ six-sitters पकडून दरमजल करीत कॉलेजला पोचले. आता तुम्ही म्हणाल , हिचं काही ना  काही  चुकतच  …. कधी बस चुकते तर कधी ट्रेन :P … आमचा क्लास पहिल्या फ़्लॊर वर असायचा. पहिले lecture चुकले , चला बरे झाले असं म्हणत मी जीना चढत होते . क्लास च्या बाहेर ३ मैत्रिणी थांबल्या होत्या. म्हटलं , बाहेर काय करत आहात. तर म्हणे  हा काय प्रश्न झाला ? पहिले lecture नाही झालं असं  ऐकल्यावर थोडं बरं  वाटलं …तसहि काय फरक पडतो म्हणा . . ही lectures म्हणजे एक फोर्मालीटी … Next lecture digital इलेक्ट्रोनिक्स चं होतं . मी bag ठेवायला आत जाते तोच प्रीती ने हाक दिली …."सोनिया , एक काम आहे , इकडे ये न जरा …" प्रीती एक भन्नाट मुलगी , सुसाट विचार , मोकळं चोकळ वागणं , हसतमुख चेहरा त्यामुळे अख्खा क्लासशी तिची मैत्री होती. मी आणि ती , स्कीट partners …. वाटेल त्या विषयावर skits केली आहेत दोघींनी … अगदी आईन्वेळी ही stage वर perform केलाय आणि गाजवलाय … तिच्या एका हाकेने मी मागे आले आणि विचारलं , " whats up ?"  काही उत्तर न देता तिने मला सगळ्यांपासून बाजूला ओढलं आणि एक पाकीट हातात दिलं .   " काय आहे हे ? माझा birthday नाहीये आज "  असं म्हंटल्यावर म्हणाली ," माहित नाही माझ्या एका मित्राने दिलय . वाच "   आता हिचे शंभर एक  मित्र … " कुठल्या मित्राने ? आणि मला  का?" असं विचारायच्या आत स्वारी गायब झाली . गुलाबी रंगाचा पाकीट भलताच मस्त होतं … Collage मध्ये सगळच गुलाबी होतं Uniform पासून वयापर्यंत अगदी सगळं … गुलाबी रंग म्हणजे स्वप्नात गेल्यासारखं वाटत …. अस म्हणत गुलाबी रंगाचा अर्थ लक्षात घेता  पाकीट उघडलं …  मी  EXPECT  करत  होते काही स्क्रिप्ट थीम असेल पण अश्या गुलाबी पाकिटात?
एका मस्त letter head वर खूपच छान handwriting मध्ये बरच काही लिहिलं होतं… Vow something interesting and exciting too …. मी वाचू लागले ….
------------------------------------------------------------------------------------------------------------
Dearest (!!) Sonia ,

                           I saw you first time in Verve competition ,a small role you played was awesome. Though, it was a small role , you were carved in my mind. Congratulations that your team won the prize in the competition. Later when I spoke to my friend, I got to know you had major contribution in directing the street play. Simply great !!
I was curious to know about you , I was trying to get some information about you from few of my friends. They told me , you are a stage actor and performed the one act plays in past. You are a poet and script writer too. I think I liked you more when  I came to know that you play musical instruments as well.  You are kind , you are soft spoken (though I didn't speak with you) , you are so modest !! My mind was getting involved in you. It was  a cherry on the top of ice cream when got to know you are good in studies too, you were among first 3 toppers last year. all your qualities made me crazy, When I close my eyes I see a perfect partner in you.

You may think , what a crazy guy is this !! Yes I am. I would like to meet you and to know more about you. You may not know me. Trust me , what ever I have written , all through my heart.  Please let me know if we can meet sometime.

If Yes from you , please be there outside Instrumentation LAB - 5th floor at 2 PM today. I will be waiting for you !!

Yours Admirer
------------------------------------------------------------------------------------------------------------

This was all new to me ... Yous Admirer !! NO NAME !! Crab who wrote this !! I was flattered, surprised, confused  and little worried too.
मी प्रीतीला शोधू लागले …. ती मला दिसलीच नाही. इतक्यात DIGITAL एलेक्टोनिक्स चे teacher आले. सगळे क्लास मद्धे बसलो. कोणी  माझे  expressions  पाहू  नये म्हणून ,मी मुद्दाम लास्ट बेंच पकडला. भलते सलते विचार येऊ लागले.  I was curious to know who is my admirer , पण थोडी भीती  पण होती कोण आहे हा !! आणि असं letter वगेरे काय पाठवायचं ,  सरळ येउन बोलायचं  ना !!

पाटील सर काय शिकवत होते , काहीच कळत नव्हतं. माझं मन भरकटत  गेला होतं कुठेतरी दूर. मी वाट बघत  होते lecture संपायची. ११.३० वाजले एकदाचे आणि सर निघून गेले. मी मानसीला म्हटलं , चल मला तुझ्याशी  काही बोलायचं आहे.
मानसी , माझी कॉलेज मधली बेस्ट buddy.  जोडगोळी होती . सगळं share करायचो आम्ही. दोघींच्या hobbies वेगळ्या , आवड वेगळी तरी  जोडी जमली होती आमची.
तिने मला Ignore केलं …. मी परत म्हंटल , " मानसी  बोलायचं आहे चल न बाहेर. ती बाकीच्यांशी बोलण्यात  बुस्य होती. मला जाम राग  येत होता तिचा. शेवटी तिचा हाथ पकडून तिला उठवल आणि बाहेर आणलं. "बोल काय झालं ?" अश्या अविर्भावात म्हणत होती की तिला काही काळातच नाहीये मी किती TENSION मध्ये आहे ते !!

कोणाला सांगू नको अशी  शपथ  देऊन ,मी तिला LETTER वाचायला दिलं . ते वाचून होताच म्हणाली " भारी कसलं लिहिलंय , he must be very romantic , फुल्टू फिदा आहे तुझ्यावर !! मग काय ठरवल आहेस , जाते आहेस का भेटायला Instru. lab la @ २ ? "  मी म्हटलं , " अगं काय आहे हे प्रकरण , कोण असेल हा , काय वेडेपणा आहे.  आणि life partner वगेरे काय !! मला खूप tension आलय … मला ह्या लफड्यात नाही पडायचं !!"   मानसी :  " बघ Serious दिसतो आहे तो , भेटून तर बघ काय म्हणतोय , कोण आहे त्यावरून  decide  कर ना  " . मी म्हंटल , " अगं Instru. Lab ला जावं तर लागणार आहे , practical आहे ना !! "  असं करूया मुद्दामून भेटूया नको त्याला , समोर आला तर बोलेन त्याचाशी.
माझी स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती. गेले तर त्याला वाटेल मी खूप excited आहे त्याला भेटायला (which I was not very much interested in) आणि नाही गेले तर practical मिस होईल. भन्नाट गोंधळ चालू होता डोक्यात !!

थोडी शांत झाल्यावर क्लास मध्ये रवाना झालो . पण सगळा माहोल मला जरा वेगळाच वाटत होता .  माहोल वेगळा होता की माझ्या डोक्यात letter प्रकरण असल्याने मला असा भास होत होता कोण जाणे. आज आता २ पर्यंत एकही lecture नव्हतं , सगळे जण मस्त TP करत होते. Annie ne माझे expressions notice केले. Annie : " अरे आज सोनिया इतनी चूप क्यो है !! क्या हुआ इसॆ , कूच tension है क्या. मी: अरे कूच भी तो नही ,  I am Normal.... असं म्हणत ब्यागच्या पुढच्या काप्य्यातल letter चपापून पहिलं . प्रीती अजून missing होती , अरे कुठे आहे ही असा मी तिच्या रूममेटला विचारलं तर मलाच म्हणे " क्या  चल रहा है तुम दोनोका ? वोह सुबहासे तुझे धुंड रही है और अब तू उसे , क्या नया नाटक competion mein participate कर राहे हो क्या ? "  मी: "अरे  नाही , बस आईसे ही " असं म्हणून मी अवरत घेतलं, म्हटलं उगाच नको भिंग फुटायला.

घड्याळाचा काटा सरकत होता आणि माझ्या tension  चा पारा वाढत होता. tension पेक्षा एक मजा वाटत होती आणि आवडलं  होतं ते tension मला :)  My first Love Letter !! Excited to know that I am admirable. आपल्याला कोणी आवडतं त्या पेक्षा आपण कोणाला तरी आवडलो आहे , हे फीलींग खूप छान असतं. त्या ३ तासात मी ते पुरेपूर enjoy केलं. १. ४५ झाले , आम्ही प्रक्टिकल साठी निघलो. मी मानसीचा हाथ घट्ट पकडलं , तीनही मला डोळ्यांनी खुणावलं "relax".

1st floor --- 2nd floor ---3 rd floor ....lets take halt yaar, जरा नेहमी पेक्षा जास्तच दम लागतोय ना?  बाकी सगळ्यांनी मला वेड्यात काढलं … :)  क्लास मधला अजून एक group चढत पुढे गेला , त्यातलं  कोणी तरी गुणगुणत होतं  " तुमसे   मिलने  कि तमन्ना  है … प्यार का इरादा है …. और एक वादा है … " मी  मानसीला एक हलकीशी smile दिली. आणि आम्ही पुढे निघलो. पोचलो ५ व्या फ़्लॊर वर …। आजू बाजूला नजर टाकली कोणी अनोळखी दिसल नहि. सरळ Lab मध्ये गेलो . माझं लक्ष आज Practical मधेही लागेना. लाब मधेही माहोल  अजीब होत तेवढ्यात प्रीतीची एन्ट्री झाली ,जोशी madam ने तिला लेट लतीफ म्हणून फटकारलं . ती ही Sorry म्हणत माझ्या next table जवळ थांबली. कोणाचं लक्ष नाहीये हे पाहून तिला मी गाठलं आणि विचारलं "कोण आहे हा हिरो …. कोणी दिलं तुला letter ?"  तीला काही माहित नाही या अविर्भावात म्हणाली " का गं ? काय लिहीलय त्यात?"  मी: " Don't tell me you dont know anything :  प्रीती: "I really don't know , Sumee met me in the morning and gave me this letter to give it to you, she did not tell me whats there in it. "  मी : कोण hi/ha Sumee?  तिला हळू आवाजात सगळी स्टोरी सांगितली. आणि सांगितलं इथे तर मला कोणी दिसलं नाही. काय  time pass करत आहे का कोणी. तिने सगळं आईकून घेतलं आणि सांगितलं प्रक्टीकॅल संपल्यावर  Sumee ला विचारेन.

३. ०० वाजले आणि आम्ही निघालो…माझी नजर भिरभिरत होती. खाली पोचलो तेवढ्यात प्रीती आली आणि तिने सांगितलं अगं Sumee ने निरोप दिलाय , त्याला तुला  भेटायचं आहे पण आता lab जवळ खूप गर्दी असेल म्हणून त्याने तुला क्लास रूम  ३ मध्ये ये म्हणून सांगितलं आहे. माझा pesions जवळ जवळ संपला होता. मी म्हंटला काय आहे यार , एवढं काय आहे , येउन बोल ना सरळ. मानसी म्हणाली अग जाऊन तर बघ …. कळेल तरी कोण आहे. I headed towards class room 3 . तीथं  जाताना , एक ground आणि कटटअ आहे. सगळं college पडीक असतं तिथे नाही तर अन्नाच्या टपरी वर. मी निघाले तेवढ्यात आमचा सगळा क्लास तिथे जमा झाला… आणि विचारू लागला कुठे चालली आहेस ? म्हटलं "घरी" … मनप्रीतने गण गाणं सुरु केलं "लिखे जो खत तुझ्हे , जो तेरी याद में  …. "  पुढची line होती कोरस " एप्रिल फूल बनाया , तो उनको घुस्सा आया  "  
 अरे यार …आज  १ एप्रिल आहे  … सगळ्यांचा प्लान माझ्या ध्यानात आला आणि letter लिहिणारी सुमी कोण हे  ही कळल. दुसरी तिसरी  कोणी नसून प्रीती च  होती  ती …सगळा क्लास involve होता ह्या प्लान मध्ये , अगदी मानसी पण . Oh God !!  You made me fool , हसत हसत मी ही एप्रिल १ एन्जोय केला. letter लिहिणाऱ्याला मी सलाम केला , एक फिल्मी DIALOGUE पेश  केला , " हे letter जर खरंच कोणी लिहिलं असतं तर , उसने दिल मांगा होता तो हम जान भी दे देते "  वाह वाह वाह वाह  करत  सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला ……

अजूनही ते गुलाबी letter  जपून thevalay. आज जवळ जवळ  एक तपानंतरही ती आठवण ठेवणीत राहिली आहे . That day he was virtual BUT I am still waiting for real someone who admire me in me. I wish , he does not remain virtual in this life time :)

Wednesday, October 8, 2014

Sing With My Heart X !!


 ….

 कशाला उगाचच
माणसं अशी भेटतात
दुरावताना का मग
डोळ्यात  मेघ दाटतात ...

दाटलेल्या मेघांना
सावरणारं कोणी नसतं
ओघळणाऱ्या आसवांना
पुसणारं कोणी निघून जातं ….

कश्यासाठी हि आशेची
तार मनामध्ये छेडतात
दुरावताना मात्र मग
डोळ्यात मेघ दाटतात ….

सुख-दुःखाच्या क्षणांना
क्षणात आपलंसं करतात
आणि दूर जाताना
क्षणांनाही दूर  नेतात ….

या दोन क्षणांच्या आठवणी
मैफिलीत सोडून जातात
दुरावताना मात्र मग
डोळ्यात मेघ दाटतात ....


Saturday, March 8, 2014

Women's day Special ...हसऱ्या चष्म्यातून ...3

Women's day Special ....


                     सकाळी जाग आली ते Mobile ring च्या आवाजाने .  मामा चा फोन होता ,  Women's dayच्या शुभेच्छा देण्यासाठी .  अर्थात मामाच्या style मध्ये त्याने जोशी  घरातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या .  अर्थात मामीला मी शुभेच्छा दिल्यावर तिने टोला टाकला …." जगातल्या समस्त ओळखीच्या महिलांना शुभेच्छांचे phone झाले आहेत. घरातल्या महिलांना विसरले आहेत तुझे मामा " अर्थात हे सर्व संभाषण गमतीने चालले होते. दिवसाची सुरुवात अशी हसत खिदळत झाल्याने बरे वाटले . मुखमार्जन झाल्यावर उकळत्या चहाचा कप घेऊन मस्त newspaper वाचत बसावे असा विचार केला .   आमच्याकडे शनिवार आणि रविवार सर्व प्रकारचे papers येतात , त्यामुळे सकाळचे २-३ तास कसे जातात ते कळत नाही सगळ्यांचा डोळा weekend -supplements वर अर्थात पुरवण्यांवर असतो.  असा छंद सगळ्यांनाच असल्याने कोणी कोणाला जास्त disturb करायच्या फंदात पडत नाही .  असो ….  चहाला आल्याचा गंध आणि सोनेरी रंग चढल्यावर , चहा कपमध्ये गाळला. माघाच्या थंडीत सोनसकाळी असा गरम चहा आणि PAPER…वाह !! …. Paper उघडला आणि सगळी कडे women's day चे लेख .  articles छान होते … somehow I started feeling proud to be a women !! Of-course I should be .. आजच नाही नेहमीच .. अर्थात स्रीत्वाची जाणीव वगैरे वगैरे… पण आजच का ? असा तात्विक विचार डोक्यात आला. तेवढ्यात कानावर आवाज पडला सोनुताई उठा … केर काढू दे मला … आमच्याकडे बरेच वर्ष काम करत असल्याने पेपर वाचनामध्ये एकच व्यक्ती वर्षानुवर्ष disturb करत आली आहे ती म्हणजे आमची कामवाली बाई -सुनीता. तिला आवडत नसल्याने तिला आम्ही बाई म्हणणं सोडून दिलं आहे … IT च्या प्रचलित style सगळेच तिला सुनीता या एकेरी नावाने हाक मारतात . अश्या आमच्या सुनीताने हुकुम सोडला , " आंघोळी करून घ्या … पटपट कपडे धुवून जाऊदे मला … तुम्हाला सुट्टी आहे मला नाही "  असा तिचा दरारा ...मी पटकन उठले ।पेपरचे चंबू गबाळ आवरले आणि पटकन अंघोळीसाठी धावले .  आई ने ही असा हुकुम सोडल्यावर कोणी केले नसते पण  तिचा वटहुकुम आम्हाला पाळावा लागतो :)))))))  हीच सुनीता १५ वर्षा पूर्वी आमच्याकडे काम मागायला आली तेंव्हा आईने तिचा BACKGROUND CHECK म्हणून काही प्रश्न विचारले, नवरा काय करतो विचारल्यावर, उत्तर expected होतं , " पिऊन पडतो आणि काय !! "  आईने पुढे काळजीने विचारलं , " मग सोडलाय का त्याने तूला ? "  ह्यावर  उत्तर unexpected आणि भन्नाट होतं  " तो कसला सोडतोय मला मीच सोडलंय त्याला !!  "  आणि ती हसायला लागली. Joke काय झाला हे आम्हाला कळलं नाही  पण आपल्याच दुखावर पांघरून घालून आनंदाने जगणं ह्याला  खरं जगणं म्हणतात ते तिला चांगलं कळलं होतं . त्या नंतर तिने तिची कथा ऐकवली . सगळ्या कष्टकरी स्त्रियांचं जगणं सर्व साधारण सारखं अस conclusion मी काढलं. हे फक्त low economy class मधे नाही तर थोड्या बहुत फरकाने सगळ्याच class मध्ये आहे हे सत्य आहे.   अश्या आमच्या सुनीताने फर्मान सोडलं सोनुताई आज तुमच्या हातचा चहा होउ दे … तिला माझा चहा आवडतो ,  पाणी कमी - जास्त दुधातला आल्याचा चहा , कोणाला नाही आवडणार ?  तिला मी चहा करून दिला आणि म्हंटला माझे ४-५ dress धुवायचे आहेत आज टाकू का ? मला म्हणाली "छे छे आज नका टाकू , उद्या भिजवून ठेवा , आज काय जरा कमी काम द्या की , women's day आहे ना आज !!" दोघीही पोट भरून हसलो … उगाचच :))))

SMS आले आहेत का ते check करण्यासाठी  mobile हातात घेतला तेवढ्यात माझ्या मात्रीणीचा phone  आला " अगं happy women's day … आज माझा program आहे रोटरी-इंनेर्व्हील क्लब मध्ये , ये ४ वाजता …"   she is active member of inner-wheel CLUB. हा क्लब बायकांचा असल्याने आज त्यांनी काही केले नाही ते नवलच. अस कळलं , आज उत आला आहे अश्या programs ना .  महिला मंडळ , भजनी मंडळ , तनिष्का ग्रूप , सावित्री बाई एकता ग्रुप , राणी लक्ष्मी बाई ब्रिगेड  … अश्या असंख्य महिलांच्या एकतेचे celebration आज चालू आहे. पण फक्त आजच का!! असो … मी एक स्त्री असल्याने असा प्रश्न विचारू नये ही सभ्यता पाळावी हा सामाजिक नियम आहे.  हे  the 'W' day चे वारे कुठे कुठे वाहत आहे हे आलेल्या sms वरून कळलं. 1. Enjoy your free ride in XXX cab today.. on the occasion of  women's day!! हे ठीक आहे  २. Enjoy the shopping bonanza in **** mall with 50% flat discount (cond. applied) on women wears !! हे ही ठीक आहे  ३. let us celebrate women's day in ***** hotel. Special offer on drinks and free disc-entry for women !! Limited booking ... hurry up !! ... ही मात्र हद्दच झाली . अनिल अवचट ह्यांच्या मुक्तांगण मध्ये आज अनेक मुली ही व्यसन मुक्ती साठी झगडत आहे आणि ड्रिंकिंग discount सारख्या offers ह्या प्रवृत्तीला खत पाणी घालत आहे अशी contradictory समाजात आहे.

women's day च्या निमित्ताने समस्त महिला वर्ग एकमेकांशी सलोख्याने वागत आहे , ३६ चा आकडा आसलेल्या सासु-सुना एकत्र भाजी आणायला चालल्या आहेत. ऑफिस मधला lady staff एकमेकांबद्दल गार्हाणी आणि gossip करण्याऐवजी कौतुक सोहळे करीत आहेत. canteen मध्ये Lunch tables var मैत्रिणी आपल्या सासूच्या चहाड्या करण्या ऐवजी माझे  सासू प्रेम ह्या विषयावर गप्पा चालू आहेत. जगातल्या सर्व स्त्रीया अचानक आज एकमेकींकडे बघून चक्क smile देत आहेत. त्यांच्या मधला jealous नावाचा रोगाचा आज नाश झाला आहे. अश्याच एका माझ्यावर राग असलेली मात्रिणी माझ्याशी आपुलकीने बोलू लागली आहे आणि माझी गळाभेट (hug) घेत आहे असं दिवा स्वप्न मला पडत होतं तेवढ्यात गुलाब ग्यांग ह्या एका नविन  movie चे गाणे ऐकू आले आणि मी भानावर आले. गुलाब ग्यांग म्हणे सगळ्या त्रास देणाऱ्या पुरुष वर्गाला धडा शिकवते आणि दुसरी स्त्रीच तिची कशी वैरीण बनते असा त्या movie चा review ऐकवण्यात आला. movie खूपच टुकार दिसतो आहे असं मानून मी channel बदलला तिथे पण महिला दिवस सोहळा , अजून एका channel वरही तीच बातमी  … बापरे …. सगळा प्रकार आता माझ्या अंगावर येऊ लागला होत. नशीब  एकाद्या  NEWS channel वर   " Breaking NEWS : आज महिला दिन है !" असं काही दिसलं नाही
आज महिला दिन आहे पण महिला ह्या दीन आहेत आणि पुरुषांच्या पायाशी लीन आहेत !! अशी प्रतिक्रिया माझ्या आईच्या एका मात्रिणीने दिली …म्हणून तर प्रश्न पडतो आजच का ?
म्हंटल चला थोडा  वेळ facebook काय म्हणतय… असंख्य women's day wishes पाहून आता मात्र मला मळमळायला लागलं होतं. google चा doogle पण तोच … ताबडतोब इंटरनेट बंद केलं. आता पर्यंत हसण्यावारी नेलेलं खूळ आता माझ्या डोक्यात जात होतं … परत परत तोच प्रश्न … आजच का?
हा सगळा २ पैशाचा तमाशा बघून मला ह्या social dramyacha तिटकारा येऊ लागला होता. आजच्या दिवशी असे कौतुक सोहळे करून महिला सबलीकरणाची गरज का वाटते । बेटी बचाओ आंदोलने  का करावे लागत आहे ? भारताची बुल्लीश वाटचाल होऊनहि का महिलांना आरक्षणाची गरज भासते आहे ? सुनेचा सासरी छळ , म्हाताऱ्या सासूला सुनेने घराच्या बाहेर काढले अश्या मागास बातम्यांना आजही उत का येतो. तरुण सुनेचा नवरा काय करत होता , म्हाताऱ्या सासूचा मुलगा कुठे लपून बसला होता.  Woman's day celebrate करूनही स्त्रीची अब्रू रस्त्यावरच आहे. तिने केलेल्या संस्कारान्मधेच काही कमी आहे का असा मोठा  प्रश्न तिला पडला आहे.  Woman doesn't need this kind of celebration , she needs respect, she needs appraisals, she needs a confidence. She has strong mind but delicate heart , never hurt her. She doesn't need ample of Money , she needs care. She is strong enough to face any challenge in a life. She amazingly handles the problems , puts the smile on face and can act like everything is fine. when the reality is world is on her shoulders and her life is slipping though the cracks on her fingers. So please respect a Sister, a Daughter , a Mother , wife, Grandmother, a friend,  lady colleague ... The only day is not sufficient to celebrate her womanhood. 

सकाळी  हास्यलहरित सुरु झालेला दिवस असा  serious thought देऊन संपला, to start  woman's (my) another day !!... 

टीप : तुम्ही माझ्या मैत्रिणी असाल तर हा लेख तुम्हाला सहज आवडून जाऊ शकतो पण माझ्या मित्रांची मी खात्री देऊ शकत नाही. कृपया माझ्या मित्रांना हा लेख पुरुष विरोधी वाटल्यास गैरसमज करून घेऊ नये ,योग्य त्या प्रतिक्रिया नोंदवा . पण हे लक्षात ठेवा आज Women's Day आहे. :)))))))))))))))))))

Friday, February 28, 2014

हसऱ्या चष्म्यातून ...2

गेला मोहन कुणीकडे  …!!!!

ऑक्टोबर महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा. तोच महिना संपता संपता , पूर्वेचे वारे वाहू लागतात आणि दिवाळीचे वेध लागायला लागतात. लहानपणी दिवाळी म्हणजे आकाशकंदील, फराळ , किल्ला आणि फटाके  एवढाच समीकरण होतं.  दिवाळीचा फराळ आणि सहमाही परीक्षेचा (mid-sem चा ) काळ असं combination असे . एकीकडे आई बनवत असलेल्या चिवड्याचा खमंग वास आणि दुसरीकडे आकाशकंदील , फटके आणि नवीन ड्रेस (तोही एका वर्षी एकच)  खरेदीचे वेध अश्या मनस्थितीत अभ्यास करणे किती अवघड होते. सहामाही परीक्षेत कमी गुण का मिळायचे ते आत्ता कळत आहे. तेंव्हा पण हे कळत होतेच पण कळूनही न वळणे ह्या म्हणीचा पुरेपूर वाक्यात उपयोग करणे हे कोणी न शिकवताच कळले होते. चिवड्याचा खमंग वास , मनात तरंगणारी करंजीची होडी, चकल्यांचे काल्पनिक चक्र , कद्बोळ्याञ्चे आकडे हेच सगळे पुस्तकात दिसत असे, त्यामुळे पेपरात लाडू मिळणे हे नेहमीचेच. हा लाडू नावडीचा, एकदम गोल गोल , आणि लाल रंगाचा . हा लाडू मिळाल्यावर धम्मकलाडू पण आपोआपच मिळत असे. म्हणून मला बुंदीचा , रव्याचा ,  बेसनाचा, डिंकाचा कुठलाच लाडू कधीच आवडला नाही. :))))

अंदाजे पाचवी , सहावीत गेल्यावर फराळा मधील curiosity अजून वाढू लागली ,  दिवाळीचा दिवस येई पर्यंत फराळ खायला मिळणार नाही असा rule असल्याने वसुबारस येई पर्यंत फक्त खमंग वासाने पोट भरावे लागे. पण आईला मदत केल्यास फराळ टेस्ट करायला मिळतो हे माझ्यातल्या नटखट Sonia ने जाणले होते. म्हणून फराळ कसा करतात हे बघायला स्वारी स्वय्पाघरात तयार असे. पेपरात  लाडू गोल मिळणे किती  सोप्पे आणि खरा लाडू गोल वळणे किती अवघड आहे असे वाटू लागले. चकल्या  कधी खुसखुशीत तर  कधी मऊ कश्या पडतात हे मोठे कोडे अजूनही उमगले नाही आहे  किंवा अनारसे हसले म्हणजे काय अश्या वाक्यांचा प्रयोग कळू लागला.  कळत न कळत आईचे मुलीला ट्रेनिंग देणे चालू होते. चिवड्याचे पोहे हे अनेक प्रकारचे असतात तेंव्हा कळले. पण त्यातला nylon पोहे हा प्रकार पचतो कसा ह्यावर  मला  research करायचा होता , तो अजूनही राहूनच गेला आहे. शंकरपाळ्यांना शंकर-पाळे का म्हणतात हे कोडे मला नेहमी पडे.  आज २० वर्षांनी ते कोडे  सुटले आहे . तो मूळ शब्द हिंदी, त्याला शख्खर-पारे  म्हणजे साखरेच्या पोळ्यांचे काप असे  म्हणतात. या शख्ख्ररपारे मधे शंकराला कोणी आणला हा मोठ्ठा प्रश्न आहे. पण त्या निमित्ताने शंकराचं नाव मुखी येते हे थोडे थोडके नव्हे. अनारस्याला वरून जो रवा लावतात तो रवा  नसून त्याला खसखस म्हणतात. लाडू बनवताना खमंग वास सुटतो तो तुपात रवा किंवा बेसन भाजल्याने असा आईची शिकवणी चालू असे. त्यामुळे खरचच आईला मदत करावी असे वाटू लागले होते. मग लाडू वळायला मदत करणे ,  शंकरपाळे करणे, कारंजीला आकार देणे , मधूनच चिवडा taste करणे … मग हे आणून  दे , ते आणून दे , डब्यात भरून ठेव अशी छोटी छोटी कामे पर्वणी वाटू लागली.

असेच एका वर्षी चकली करणे चालू होते. आई चकलीचे पीठ मळत असल्याने तिने मला आतून मोहन आणावयास सांगितले. मी आत गेले आणि मोहन शोधू लागले. (मोहन  म्हणजे गरम केलेले तेल) छोटे डबे झाले , मध्यम डबे , मोठ्ठे डबे झाले मोहन काही सापडेना. असं वाटलं शेजारच्या रानडेंच्या मोहनदादाला आणून उभं करावं !! तेवढ्यात आवाज आला "आता गार झालं असेल पण सावकाश आण". मी विचार सुरु केला गार झालं असणार म्हणजे फ्रीज किव्हा माठापाशी काहीतरी असणार. मी तर confidently आले आहे मोहन आणायला , मग विचारायचे कसे - मोहन म्हणजे काय ?… माझ्यापुढे मोठ्ठा प्रश्न पडला होता … पण तरी स्वारी विचारायला तयार नव्हती … केवढा मोठ्ठा ego होता ह्या चिमुरड्या जीवामध्ये … तो इगो की independent आणि knowledgeable असल्याची जाणीव होती !!  हार पत्करणे रक्तातच नाही.

मी फ्रीज मध्ये शोध शोध शोधले , पण मोहन काही सापडेना , काय सापडायचे आहे हेच माहीत नसल्याने झालेली मोठी पंचाईत झाली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून माठाजवळ शोधणे सुरु केले. मागे पुढे आत बाहेर सगळीकडे पहिले. आता मी तिपाहीच्या खाली बघावे  म्हणून माठ उचलला. पाण्याने भरलेला माठ , मला पेलवणार तो  कसा!! माझा हात सटकला, माठ फुटला आणि पाणी सांडले , त्यात माझापाय सटकला आणि मी त्या पाण्यात पडले !!…. काही फुटल्याचा आणि धप्पकन पडल्याचा आवाज ऐकून आई ,बाबा , लहान भाऊ , मदतीला आलेल्या शेजारच्या काकू सगळे स्वयापाघरात जमा झाले माझी अवस्था केविलवाण्या कुत्र्याच्या पिल्लासारखी झाली …. अचानक माझं मलाच हसू आलं आणि मी आईला म्हटलं …
पाणीच पाणी चहु कडे गं बाई…  गेला मोहन कुणीकडे ?????????? :))))


हसऱ्या चष्म्यातून ...1

चंद्रशेखर गोखल्यांच्या ('मी माझा' फेम) जमान्यात बरेच कवी चारोळ्या लिहू लागले , मी ही थोडा प्रयत्न केला ,पण माफकच …


जसे …।

कधी कधी वाटतं
सांज वातीकडे एकटक पाहत राहावं
कोणी आपल्याकडे बघू नये
पण आपला जग मात्र एकट नसावं ...

-----------------------------------------------------------------------
लिहायला घेतलं  तर
मनात शंका येत जातात
पेन धीर देतं आणि
कागदावर अक्षरं उमटत जातात
-----------------------------------------------------------------------

काही  चारोळ्या लिहिल्यानंतर कळलं चारोळ्या लिहिणं म्हणजे श्रीखंडातील चारोळ्या शोधण्यापेक्षाही कठीण काम आहे :)))))))))) त्यामुळे श्रीखंड फक्त  खावे  ते  बनवण्याच्या  फंदात  पडू  नये . त्यातूनही  चारोळ्या  घातलेल्या  श्रीखंडाच्या  तर  अगदीच  नाही .