Wednesday, September 8, 2010

Sing With My Heart II

कालिदास पारितोषिक : द्वितीय

पंख हवेत मला पंख


दूरवर दिसणाऱ्या
क्षितिजापर्यंत मला उडायचं
असीमित आकाशात

दूरवर जाऊन पाहायचं

सार जग 
तिळा एवढं दिसेलअसं स्वप्नं मला घडवायचं
म्हणून, मला पंख हवेत पंख

चिमुकल्या पंखांनी उडण्यासाठी
मला आशा हवी आहे
एक दिशा हवी आहे
दूरवर जाता जाता मला

मायेची
भाषा हवी आहे
उन्हात 
होरपळनार्यांना
सावली देण्यासाठी
मला हवेत विशाल मायेचे पंख
पंख हवेत मला पंख
ईर्श्या आहे मला जग हलवायची  

इच्छा मला नवी दुनिया बनवायची
पण आहे या आखूड हाताची खंत
यासाठीच , पंख हवेत मला पंख

पंख हवेत मला पंख


------------------------------------------------------------------------------------------------


अंत

चाललेली एक नाव
समुद्रात भरकटत गेलेली
लाटांसवे सारे जीवन
वाहून घेतलेली
लाटच तिचे स्वप्न
लाटच तिचे जीवन
तिच्या वरच उरलेले
हिचे आयुष्याचे क्षण
भासते कधी ती
जणू कधी प्रचंड
पर्वत तेंव्हा वाटतो
तिच्या आयुष्याचा शेवट

जीवनात तिच्या लाटांच्या माळा 
लाटांचा तिने केला हिंदोळा
लाटा मद्धेच ती एकदा विरून गेली
लाटांच्या पोटात सामाऊन गेली

तिच्याच संगे राहून
तिलाच जीवन वाहून
तिनेच केला शेवट
तिनेच केला अंत
-----------------------------------------------------------------------------------------------

Sing With My Heart I

Few of the releases( especially for school going kids .. ) in SAKAL; TARUNBHARAT News paper ... years back !!
मुंगीने गाठली दिल्ली

दिल्लीला राहते का मुंगे तुझी नात ?
कावळ्याने विचारले पान खात..

मुंगीने विचारले माहीत आहे का दिल्ली
नाहीतर शोधावी लागेल गल्ली न गल्ली

घेतली एक किल्ली कावळ्याने
नकाशा काढला त्या बावळ्य़ाने

भारताचा एक नकाशा काढला
दिल्ली सापडली म्हणून तो नाचला

मुंगी भरभर नकाशावर चढली
मुंगीने झटक्यात दिल्ली गाठली

-------------------------------------------------------------------------------------------------
गीत मजेचे गावे

काटयातुनी वर यावे
फुलांमधले बकुल व्हावे
ना सुकता टिकून राहावे
गीत मजेचे गावे

झऱ्यातुनी खळाळत जावे
गावातावारचे दव व्हावे
शेतामधले कणीस व्हावे
नि गीत मजेचे गावे

इंद्रधनुच्या रंगत जावे
पाखरांचे सोबती व्हावे
सागरातील लाट व्हावे
गीत मजेचे गावे

खडतर जीवनातूनी थोडे
बाहेर येऊन पाहावे
आयुष्यातील दवबिंदू
अंगावरती घ्यावे
नि गीत मजेचे गावे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आनंदाचं गाणं

तिथ  खूप हसायचं असतं
सगळ्यांना जागवून
स्वताही जगायचं असतं

सागराच्या लाटान्संगे
तिच्याचसवे झुलायचं असतं
वेलीवरच्या फुलांप्रमाण
सर्वांसंगे फुलायचं असतं

वाळवंटात एखादं
झाड होऊन बघायचं असतं
सुवासासाठी मात्र
चंदन होऊन झीजायचं असतं

खळाळणारे झरे असताना
सागर बनून रहायचं असतं
ह्या अनुभवातून जाताना मात्र
गडगडत बरसायचं नसतं

आनंदाचा गाणं सगळ्यांनाच जगवतं
तुम्हीच विचार करून बघा
अश्रूंना वाट देऊन मात्र
कुणा काही मिळतं ?

-सोनिया 

Friday, September 3, 2010

Sing With My Heart...

When you dont know you are in love ...
तू कोण माझा ?
संथ गार वारा स्पर्श करून जातो
सुगंध तुझ्या आठवणींचा
अंग अंग शहारून नेतो
तेंव्हा मनात विचार येतो
खरच तू कोण माझा ?

तू जेंव्हा जवळ असतोस
तो प्रत्यक क्षण मोलाचा वाटतो
कारण तुझा अबोलाही
तुझाच मन बोलत आसतो
तेंव्हा मनात विचार येतो
तू कोण माझा ?

तू माझ्या नजरेत येत
मन हे बेधुंद होते
पण नजरेत नजर मिळता तुझ्या
माझीच नजर साशंक होते
आणि मला प्रश्न विचारते
खरच तू कोण माझा ?

ही साशंकता दूर करशील का ?
हा अबोला तू सोडशील का ?
ते सुगंधी क्षण मला देशील का ?
सांगून तू कोण माझा ?


- Sonia