Monday, January 17, 2011

Sing With My Heart III






During my college days ...
क्षण

काही क्षण असे असतात की ते,
सुन्न झालेल्या दिशांना वाट दाखवतात,
पण ती वाट फक्त असते कोरडी,
तरीही तिथे तिला फुलेच मिळतात.


इथे कही क्षण असे असतात की,
आसवांनाही ते रडायला लावतात,
त्यांना बांध घालायला मात्र तिथे,
कुणाचेही डोळे नसतात

इथे काही क्षण असे असतात
ज्यांना क्षणिकही पर्वा नाही
कुणाचीही नाही ,
अगदी उमललेल्या फुलान्चिही नाही

काही क्षण धुंद असतात ,
आनंदी अणि सुखी असतात,
त्याना अडविण्या मात्र,
कुणीही येत नाही, येणार नाही

जे क्षण असतात सोनेरी रुपेरी,
ते रहातात मन पटलावर रहातात,
अणि सुगंधी आठवणी आठवत,
मनामधेच रमतात

सोनिया


---------------------------------------------------------------------------------------------------------------
एका एकंकिकेसाठी लिहिलेली ही कविता (those college days!!!):
माझ्या स्वप्नातील राजकुमारा
तुझ्या स्वप्नातले मी फूल रे
तू झालास पाखरु तरी
भिरभिरते पंखा मी रे

सोसाट्याचा सुटेल वारा
ना सुटेल साथ तुझी रे
तू झालास कोकिल तरी
तुझ्या गल्यातिल कंठ मी रे

मी सरिता अन तू किनारा
मजाच तू एक सहारा
खळाळत्या वाटेवर तू
मला साथ देशील ना
येतील धुमाले किती तरी
तू मलाच हात देशीं ना !

हे माझे सुर तुझे होतील रे 

कारण,
माझ्या स्वप्नातील राजकुमारा
तुझ्या स्वप्नातले मी फूल रे ......


-Sonia


-----------------------------------------------------------------------------------------------------------


तुझी फुले ...
तुझ्या मनातील गीत मला ,कधीच ओलाखता आले नाही
तुझ्या मनातील सुर मला , कधीचउमगले नाहीत
तरीही तू माझा कधी झालास, हे मला कळलेच नाही
तुझी ती फुले न कळत पणे माझ्याकडे राहिली
माझ्या मनात अचानक पणे गुन्फिली गेली
पण त्या फुलांनी कधी मला सुगंध दिलाच नाही



फुले कोमेजली , तरी घ्यायला तू कधी आलाच नाहीस
पुन्हा फुलांना रंग द्यायला तू कधी बहरलाच नाहीस
आड़ वाटेवरून जाताना तू मला विसरलास हे मी जाणले नाही
त्या वाटेत मात्र काटे रुतले हे तुला का उमगले नाही ?





तरीही तुझी  आठवण मी साठवून ठेवीन
आठवणींचे गाणे मी नेहमीच गात राहीन
तू माझा  अन मी तुजी होते ह्या निरागस प्रेमाची आठवण
फुलांबरोबर जपून ठेवीन
-Sonia











2 comments:

  1. Kiti sundar lihilays tu.. tinhihi kavita ek se ek ahet.. lai bhari..

    ReplyDelete
  2. thanks .. :) ..those college days .. immatured .. dreamy .. irrelevent writting :)

    ReplyDelete