Tuesday, August 13, 2013

Sing With My Heart IV !!

My father and his friends planned for a trip to Bhimashankar. They thought, Tuesday would be a nice and clear day. But it was continuously raining for past 2 days. They were discussing on the travel plan and my Dad suddenly said " hya pavasala ved lagalay, thambatach nahiye(Rains' gone Mad:))". What a beautiful sentence it was!! ... I am amazed with this 'Veda Paus'.   At a times , our mind behaves like the rain........... very uncertain and possessive. You can't control your mind as we can't control the Rain. Poet is trying  to find out can rain control & console his mind....

 वेडा पाऊस 

 पाऊसही वेडा  झालाय
श्रावाणालाही आषाढ समजू  लागलाय
आषाढातही  धो धो  पडायचं
श्रावणातही  उन्हाला लाजावायचं 
रडून  आता ढगांनाही थकवा आलाय
आज नं पाउसही वेडा झालाय

वेडया पावासा तुझी
किती वाट पाहीली आम्ही
तेंव्हा तू फिरकलाच नाहीस
ढगात गुरफटून पडून राहीलास
वाऱ्याच्या दिशेने वाहात राहिलास 
आज मलाही तुझा खूप राग आलाय
 हा पाऊस खुप वेडा झालाय

माझं  मनही तुझ्यासारखच 
खूप वाट पहात राहायचं
दुःखात  असताना खूप रडायच
आनंदाच्या दिवशीही  उगाच रुसायचं

खूप खूप पळायच
दमल  तरी नाही थांबायचं
माझ्या मनाला एकदा सांगून बघ
कोसळत राहीलास तर काय दशा होईल
मला माहिती आहे
त्याचा तुलाही  नक्की कंटाळा आलाय
हा पाऊस  अगदी वेडा झालाय

~ सोनिया

4 comments: