दिवस खूप busy जातो, तेंव्हा असं वाटत पट्कन जेऊन झोपावं, आडवं पडल्यावर लगेच झोप लागेल. पण तसं होत नाही. मनामध्ये अचानक भरमसाठ विचार थैमान घालू लागतात. इतके विचार असतात की ते कागदावर उतरवल्याशिवाय झोप लागत नाही. दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे ह्याचा थांगपत्ता लागत नाही असं म्हणतात. ते खरं आहे. पण आपल्याच मनाच्या कप्प्यात काय चालू आहे हे कळेनासं होत ,तेव्हा काय? माझा funda आहे की सगळं लिहून काढावं. उगाच रात्र जागवण्यापेक्षा ते बरं नाही का !! विचार कुठून येतात ते कळत नाही . पण कागदावर उतरवल्यावर खूप काही समाधान मिळतं. असंख्य कवी आणि लेखकांच हे असच आहे ,उमगलं आहे मला (अर्थात मी काही कवी किंवा लेखक आहे असं म्हणायचं नाही , पण असो ). हे असं का ह्याचं astrological analysis करायचा माझ्यातल्या अर्धवट astrologer ने प्रयत्न केला. बुधाची चमक की शुक्राची झळाळी असते अश्या कवी लेखकांमध्ये ते कळलं नाही. पण गुरुबळ सगळीकडेच हवं हे मात्र नक्की. म्हणजे पू. ल. , व.पु , कुसुमाग्रज, बालकवी ह्यांसारख्या दिग्गजांच्या लिखाणाची पारायणे करण्याने काहीतरी लिहायची खुमखुमी येत नाही हे दुर्मिळच. असे दिग्गज म्हणजे आपले गुरु, मग ग्रह तारे पाहिजे कशाला. अश्या गुरूंच्या पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपली प्रतिभा वाढवावी, खुलावावी.
कवी आणि लेखक (दोघेही तत्ववेक्ते ) ह्यांच्या पासून लोकं चार फर्लांग दुरून जातात हे सत्य आहे. त्यामुळे कवी आणि लेखकांनी लोकं आपल्या पासून किती फर्लांग दुरून पळत आहे त्यावर प्रतिभेचे प्रदर्शन करावे. :)) ह्यात दोष हा कवी चा नाहीच मुळी, त्या कविता समजणाऱ्याचा आहे. कारण कवी लिहितो, पण त्याचे अर्थ काढणे; हे वाचणाऱ्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. प्रेम कविता लिहिल्यावर कवी प्रेमात पडला किंवा विरहगीत लिहिले म्हणजे नक्कीच प्रेम भंग झाला आहे असे conclusion सहज काढले जाते. ते कितपत खरे तो कवीच जाणो. पण देशप्रेमाच्या कविता लिहायला मात्र देशाच्या प्रेमात पडायलाच हवे हे शंभर टक्के खरं.
माझ्या बऱ्याच कविता वाचून , मी खूप दुख्ही आहे की काय असा माझ्या आईचा समज(खरतर गैरसमज) होऊ लागल्यावर तिने मला एक सल्ला दिला . आईने दिलेला सल्ला हा फुकटचा कधीच नसतो , तो ऐकला नाही तर महागात पडतो त्यामूळे तो ऐकणे भाग पडले आहे. तुझे लिखाण करताना ते हसऱ्या चष्म्यातून बघ कदाचित तुला वेगळा आनंद मिळेल आणि तुझ्या निरस कविता ऐकण्यापासून आम्हाला सुटका मिळेल !!!! :))))) आता आईचा शब्द शेवटचा अश्या संस्कारात वाढल्याने मी हा प्रयत्न करत आहे . हसऱ्या चष्म्यातून माझ्याच विचारांना पाहणे आणि लिहून काढणे. पाहूया जमते आहे का ते !!
टीप : हा ब्लॉग वाचणारे अनेक उत्तम लेखक, कवी ,वाचक असू शकतात , त्यांना माझे लिखाण सुमार वाटण्याची शक्यता आहे. तरी त्यांनी जपून वाचावे आणि सल्ले द्यावेत. आणि इतरांनी कृपया पळून जाऊ नये ही विनंती. :)))))

Chan lihila ahes.. khup vichar karayla lavnara lekh.. mi pan 'hasara chashma' ghalun baghen :) waiting for next
ReplyDelete