Poetry is the
spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion
recollected in tranquility : William Wordsworth
उमगे ना माझे मला
कंठ कधी हा दाटला
हरवले गाणे ओठामध्ये अन
स्वर कुठे हा हरवला …
वेचली स्वप्न फुले मी
मनी रंग ही गंधाळला
गंध राहिला ओंझळीत अन
रंग खाली सांडला …
समजे ना माझे मला
हा दिवस कधी सांजावला
आभाळ झाले मोकळे अन
ऊन-सावलीचा खेळ संपला …
No comments:
Post a Comment